3X4 (2)

About Adarsh Academy

3X4 (2)
1 (2)

'Basic to advance' असा दृष्टिक्षेप समोर ठेवून स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मूलभूत चळवळ म्हणून 3 जानेवारी 2022 रोजी आदर्श अकॅडमी ची स्थापना करण्यात आली.


आजच्या डिजिटल युगामधील डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक परीक्षाभिमुख आणणे आणि विद्यार्थ्यांचा केवळ ज्ञानाधिष्ठित नव्हे तर कौशल्याधिष्ठित व्यक्तिमत्व विकास साधणे.


अविरत स्पर्धेच्या या युगात विद्यार्थी अखंडपणे अभ्यास करत राहतो. परंतु तो करत असलेला अभ्यास एकेरी दिशेने आहे का? अभ्यास परीक्षाभिमुख आहे का? आणि विस्मरणात तर जाणारा नाही ना? याची वेळोवेळी चाचपणी होणे आवश्यक असते. याचा चाचपणीच्या मार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आमच्या अकॅडमी मध्ये रेग्युलर टेस्ट सिरीज घेण्यात येते. यातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासाचे परिपूर्ण मूल्यमापन केले जाते. त्यानंतर त्याचे अनुधावन (follow-up) देखील केले जाते.

प्रसिद्ध लेखिका झुंपा लाहिरी यांनी म्हटल्याप्रमाणे, “That's the thing about books. They let you travel without moving your feet." स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या आयुष्यातील पुस्तकाचे महत्त्व अत्त्युच्च आहे. म्हणूनच अगदी पुण्याच्या माफक दरामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्यात प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. 

एकाग्र चित्त असेल तर प्रसन्न अभ्यास होतो' असे म्हटले जाते. याच दृष्टीने अभ्यासात एकाग्रता आणण्यासाठी 'अभ्यासिका' ही सिंहाचा वाटा उचलत असते. म्हणूनच आम्ही आमच्या अकॅडमीमध्ये अभ्यासिकेची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.

आदर्श अकॅडमीचे संचालक श्री स्वप्नील सानप सर हे स्वतः 2015 सालापासून स्पर्धा परीक्षेचे पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत. 2016 साली ते स्पर्धा परीक्षेतील लेखन क्षेत्रात उतरले. महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय अशा  'अभिनव प्रकाशन, पुणे' च्या बॅनरखाली त्यांनी महाराष्ट्रातील समग्र समाजसुधारक, ABHINAV CLASSIFIER, ABHINAV ANALYSER अशी नामांकित पुस्तके लिहिलेली आहेत. लेखन आणि मार्गदर्शनाचा अनुभव हा दुहेरी संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला आहे. यातून विद्यार्थ्यांना परिपूर्ण असे मार्गदर्शन भेटेल, यात काहीच शंका नाही. विद्यार्थ्याच्या प्रत्येक समस्येची जाण असणारे किंबहुना त्याच्या समस्येच्या निराकरणासाठी झटणारे स्वप्निल सर हे या अकॅडमीचे खरे 'आदर्श व्यक्तिमत्व'.


VISSION

विद्यार्थ्यांमध्ये अनेक अंगभूत व उपजत गुण असतात. स्पर्धा परीक्षेतील सागरामध्ये उतरताना विद्यार्थी ज्या ऊर्जेने आणि उत्साहाने येतो, त्या ऊर्जेचे व उत्साहाचे यशामध्ये रूपांतर होईपर्यंत आदर्श अकॅडमी विद्यार्थ्याचा पाठपुरावा करत राहते. त्याच्या अभ्यासात येणाऱ्या पदोपदी उणिवा जाणून त्याचे निराकरण करणे आणि त्यानंतर त्याचे सकारात्मक ऊर्जेत रूपांतर करणे, याची हातोटी या अकॅडमीच्या प्रत्येक मार्गदर्शकाकडे आहे.

MISSION

विद्यार्थ्याच्या प्रत्येक समस्येची जाण असणारे किंबहुना त्याच्या समस्येच्या निराकरणासाठी झटणारे स्वप्निल सर हे या अकॅडमीचे खरे 'आदर्श व्यक्तिमत्व'.